भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

फैजपूरयावल

फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

६.५१ कोटींच्या निधीतून सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारणार

फैजपूर.ता.यावल.मंडे टु मंडे न्युज | रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत फैजपूर (ता .यावल) येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या विकासकामाचे आज केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी कामासाठी शासनाकडून ₹६.५१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या या नवीन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमानता मिळण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना शासकीय कामांसाठी अधिक सुसज्ज, सुविधायुक्त आणि कार्यक्षम प्रशासकीय सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.


नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आवश्यक त्या विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही कामकाजाचे वातावरण अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे नागरिकांची कामे अधिक प्रभावीपणे आणि सुरळीतपणे पार पाडण्यास चालना मिळणार आहे.या भूमिपूजन कार्यक्रमास स्थानिक भाजपा पदाधिकारी, नगरसेवक तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!