भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनशिराबाद

सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद परिसरातील सराईत गुन्हेगार शोएब शेख गुलाम नबी ऊर्फ ‘शोएब बिल्डर’ (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह, येरवडा (पुणे) येथे करण्यात आली.

शोएब बिल्डर याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, बेकायदेशीररीत्या जमाव जमवून मारहाण करणे तसेच तडीपारी आदेशाचे उल्लंघन यांसारखे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या कथित गुन्हेगारी कारवाया आणि परिसरातील वाढती दहशत लक्षात घेऊन नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. त्यानुसार पोलिसांनी शोएब बिल्डर याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविले.

पोलीस पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख , प्रशांत विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर , पंकज सोनवणे , प्रविण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सुनिल दामोदरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!