रावेरसामाजिक

ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री व संकटमोचक ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पुनखेडा– पातोंडी रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, दि. १७ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे भूमिपूजन महंत राजगिरी महाराज, भूतनाथ मंदिर, पुनखेडा यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या विकासकामासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे बहुप्रतीक्षित काम अखेर मार्गी लागले आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक गावांना जोडणारा असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता विकसित होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण असून, आमदार अमोलभाऊ जावळे यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रावेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!