भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

प्राथमिक विद्यामंदिरात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

ऎनपुर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपूर ता.रावेर : येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी भारतीय संविधान दिनानिमित्त भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन सकाळी ठीक ९ वाजता शाळेत आयोजित करण्यात आले होते.


यावेळी शासनाच्या निर्देशानुसार शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील,उपशिक्षिका कल्याणी शिंदे,जयश्री सराफ,जागृती पाटील,चंदा महाजन,वैष्णवी महाजन,श्रद्धा बारी,संजना महाजन,काजल धनगर उपशिक्षक किरण चौधरी व विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्गाच्या समवेत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!