गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या सराईत आरोपी ला अटक
नशिराबाद (जळगाव )मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथील बसस्टँड परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या सराईत आरोपीस पोलिसांनी अटक केली. ही कारवाई 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता करण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नशिराबाद गावात कमलाकर प्रभाकर महाजन (वय 36, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) हा बसस्टँड परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नारखेडे यांनी पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलिस पथकाने अचानक छापा टाकून आरोपीस जागीच पकडले. त्याच्याकडून लोखंडी, चंदेरी रंगाचा व काळ्या रंगाच्या प्लास्टिकची मुठ असलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 123/2026, शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ), राजेंद्र ठाकरे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल हरेश पाटील, पोहेकॉ चंद्रकांत पाटील, पोहेकॉ गुणवंत देशमुख, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ सागर बिडे, पोकॉ प्रविण लोहार आणि पोकॉ समीर सय्यद यांनी सहभाग घेतला.
