जळगाव चे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली, श्रीकांत धिवरे नावे पोलिस अधीक्षक
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्य शासनाच्या गृह विभागाने दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) करण्यात आली असून धुळेचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली आहे.
सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून (तात्पुरत्या स्वरूपात) जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.
तसेच गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांची पदोन्नतीसह पोलीस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
