भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईम

पाकिस्तानात बंदुकीच्या धाकावर हिंदू मुलीच अपहरण, नंतर तिच्या सोबत लावलं लग्न

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाकिस्तानातून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात बदीन जिल्ह्यात मतली मध्येवचार मुलांनी बंदुकीचा धाक दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीच अपहरण करण्यात आलं. त्यानंतर काही वेळाने तिच्या सोबत लग्न केल्याची बातमी समोर आली.


डॉन वर्तमानपत्रानुसार, मतली गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने मानवधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे. आधी चार युवक त्याच्या घरात घुसले आणि १५ वर्षीच भाचीला उचलून घेऊन गेले. मानवधिकार आयोगाने संपूर्ण प्रकरणात रिपोर्ट सोपवलाय. सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टे यांचा बालेकिल्ला आहे.

तिच्या मामाने या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या भागात बंदुकीच्या धाकावर मुलीच अपहरण केलं, तिथे लोकांमध्ये दहशत आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासनुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. मंसूर डार आणि मकसूद डार ही दोन आरोपींची नावं आहेत. अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही.

पाकिस्तानात अल्पवयीन मुलींशी लग्न करणं हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जामीन मिळत नाही. पाकिस्तान सरकारने यासाठी कठोर कायदा बनवला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्याला सात वर्ष कारवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मानवाधिकार आयोगाने पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ३६५ -बी, ३६४-ए आणि ५०६ अंतर्गत कारवाई करण्यास सांगितलं आहे. आयोगाने तात्काळ मुलीला शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानात जवळपास ४४ लाख हिंदू राहतात. बहुतांश हिंदू सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तान मानवधिकारानुसार त्यांच्या देशात हिंदुंची स्थिती मजूरांसारखी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!