अवैध धंद्याची बातमी : पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी
पाचोरा,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाचोरा शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत (सट्टा, पत्ता, ऑनलाईन चक्री) पाचोरा येथील पत्रकार राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या. या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला (रा. कृष्णापुरी) याने पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार, या प्रकरणी शेखर पाटील उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी. मागील सात ते आठ दिवसांचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड (CDR) काढून तपास करावा, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई कराल, अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने देण्यात आले
निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पाचोरा भुवनेश दुसाने, नाशिक विभागीय अध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष. किशोर रायसाकडा, अबरार मिर्झा विभागीय कार्याध्यक्ष तथा राज्य कमिटी सदस्य, प्रवीण ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष, कुंदन बेलदार, स्वप्निल कुमावत, छोटू सोनवणे, दिलीप जैन, चेतन महाजन, सुनील कोळी,राजेंद्र खैरनार, भालचंद्र राजपूत, गजानन लादे, रविशंकर पांडे,जावेद शेख आधीचे सह्या आहेत. निवेदनाचे प्रति राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, ग्रह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र , व जिल्हाधिकारी जळगाव, जळगाव पोलीस अधीक्षक तहसीलदार पाचोरा यांना पाठवले आहे.