महत्वाची बातमी : वाहनधारकांना मोठा दिलासा ! HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवली
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात महाराष्ट्र परिवहन विभागाकडून सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू एवढ्या गाड्यांचं कमी कालावधीत HSRP नंबर प्लेट बदलणं शक्य नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून ती ३० एप्रिल करण्यात आली होती. परंतु गुरुवार २० मार्च रोजी या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत वाहनधारक एचएसआरपी नंबर प्लेट बसवू शकणार आहेत. एप्रिल आणि मे पर्यंतचे स्लॉट बूक झाल्याने अनेकांना अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. तसेच नंबर प्लेट मिळवण्यासाठी देखील विलंब होत होता. परंतु आता मुदत वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या ३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवता येणार आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट ही एक वाहनावर घट्ट बसवली जाणारी विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे. यात काही खास फीचर्स आहेत. छेडछाड रोखण्यासाठी क्रोमियम-बेस्ड होलोग्राम, वाहनाचा १० अंकी युनिक कोड, लेसर-ब्रँडिंग आणि प्रेस्ड नंबर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्लेट ती टॅम्पर-प्रूफ असते. आतापर्यंत सुमारे १८ लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसलवल्याचा अंदाज व्यक्त वकरण्यात आला आहे. नंबर प्लेट लावण्यास मुदतवाढ मिळाल्याने वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.