भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

Big Breaking : जळगाव जिल्हाधिकारी मित्तल व जि.प. सीईओं आशिया यांची बदली

जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | विहीत कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच जिल्हाधिकारी Jalgaon District Collector अमन मित्तल यांची बदली करण्यात आली असून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Jalgaon ZP CEO डॉ. पंकज आशिया यांचीही बदली करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आज आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यात अमन मित्तल आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अमन मित्तल यांनी सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. यानंतर त्यांच्या येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले नसतांनाच आज त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी अमन मित्तल त्यांच्या जागी सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. तर त्यांच्या जागी गडचिरोली येथील आयएएस अधिकारी अंकित या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तीन वर्षांच्या आधीच त्यांची उचलबांगडी झाल्याने चर्चा रंगत असून वाळू माफियांचा धुमाकूळ, वाळूसह शस्त्र परवान्यांबाबतच्या तक्रारीं तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या विरोधात अगदी उच्च पातळीपर्यंत केलेल्या तक्रारी यासर्व बाबींमुळे जिल्हाधिकार्‍यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!