भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

१५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव बांधकाम विभागाचा अधिकारी धुळे एसीबीच्या ताब्यात !

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता पंधरा हजारांची लाच स्विकारतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे आरखेक वासूदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन मोहीत नगर, जळगाव रोड भुसावळ) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास केली. या कारवाईमुळे खळबळ माजून गेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे याकरीता तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अर्ज दाखल केला होता. नाहरकत लवकरात लवकर मिळावी या करीता या करीता तक्रारदार व त्यांच्या मित्राने कार्यालयात वारंवार फेऱ्या मारीत होते. यावेळी कार्यालयातील आरेखक वासूदेव धोंडू पाथरवट यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता सुरुवातीला दोन हजार आणि काम झाल्यावर पंधरा हजार द्यावे लागतील अशी मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी आरेखक वासुदेव पाथरवट यांना पंधरा हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!