मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात चार युवक जागीच ठार
जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दिलेल्या धडकेने जामनेरातील चौघे युवक जागीच ठार झाल. हा भीषण अपघात मंगळवार दिनाक २५ नोव्हेंबर रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर घडला. अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकीरा साबळे आणि रवी सुनील लोंढे (सर्व रा. जामनेर) अशी मृतांची नावे असून ही चारही तरुण २० ते २२ वयोगटातील आहेत.
या अपघातात मालवाहू वाहनावरील चालक जुबेर कुरेशी हा देखील जखमी झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविले.
जामनेर-पहूर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर भरधाव सिल्लोडच्या व्यापाऱ्याकडील मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने चौघे युवक जागीच ठार झाले. मृत युवक जामनेरच्या जामनेरपुरा व भीमनगर भागातील रहिवासी असून २० ते २२ वयोगटातील आहेत.

