जळगाव जिल्ह्यात दिवसभरात १०९३ जणांना कोरोनाची बाधा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०९३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३५६,जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ- ६६, अमळनेर-७६, चोपडा-१००, पाचोरा-१२, भडगाव-२२, धरणगाव-७०, यावल-४३, एरंडोल-५५, जामनेर-३१, रावेर-३५, पारोळा-२५, चाळीसगाव-९५, मुक्ताईनगर-३३, बोदवड-३३, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण १०९३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७९ हजार ५६३ पर्यंत पोहचली असून ६८ हजार ०७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५१३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९९७७ रुग्ण सध्या उपचार घेताय.