भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

लाच मागतांना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या विस्तार अधिकारी व ग्रामसेवकाला पोलिस कोठडी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ग्रामपंचायतीच्या शिपायाच्या जादा वेतनाचा अहवाल पाठवण्यासाठी, दोन हजार रुपयांची लाच मागतांना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या विस्तार अधिकारी व ग्रामसेवकाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

धरणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरेश शाळीग्राम कठाळे व कंडारीचे ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची लाच मागितल्याने, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सोमवारी अटक केली होती.

सुरेश कठाळे व कृष्णकांत सपकाळे या दोघा संशयितांना मंगळवारी अमळनेर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी, संशयितांच्या खिशात बारा हजार रुपये आढळून आले. त्याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यामुळे न्यायाधीश गायधनी यांनी २ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!