माहीत असूनही अल्पवयीन मुलीचा विवाह लावला,गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुलीचे वय माहित असूनही तिचा विवाह लावण्यात आला. एवढेच नव्हे, तर पतीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी १६ वर्षीय पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून पतीसह ७ जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एका भागात पीडिता वास्तव्यास आहे. पिडीता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही मामा नवाब तडवी (पूर्ण नाव गाव माहित नाही), सासरे बशिर तडवी, पतीचे मामा (पूर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह तीन महिलांनी लग्न लावले. तर लग्नानंतर पती साहिल बशिर तडवी याने ६ जून २०२१ ते दि. ८ फेब्रुवारी २०२२ पावोतॊ वेळोवेळी वारंवार शारीरिक संबंध केल्याने पिडीता ३ महीन्याची गरोदर राहीली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. बळीराम हिरे हे करीत आहेत.