भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराजकीय

कोरोना रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटलने अवाजवी बिल आकारल्यास तक्रार करावी– खासदार रक्षा खडसे

भुसावळ – आज जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची (दिशा) बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून तीन ते चार लाखापर्यंत अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण झाले झाले आहेत. भरमसाठ बिलाला आता लगाम घालण्यासाठी पावले उचलण्यात यावीत.

तसेच कोरोना उपचारासाठी शासनाने निश्चित केलेले जसे खाजगी रूम साठीचे दर, जनरल साठी दर, पीपीइ किटचे किती पैसे लावले पाहिजेत यासाठीचे दर मोठ्या अक्षरात हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागावर लावण्यात यावेत.

खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या समितीने आतापर्यंत रुग्णांकडून जास्त घेतलेल्या 1 कोटी रकमेच्या आसपासची रक्कम लोकांनां परत देण्याचे निर्देश खाजगी हॉस्पिटलना दिलेले आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा केली जाईल. शासनाच्या निर्धारित दरापेक्षा जास्त बिल जे खाजगी हॉस्पिटल रुग्णांकडून आकारात असेल अशा हॉस्पिटलची तक्रार करावी असे खासदार रक्षा खडसे यांनी आवाहन केलेले आहे.

याच बैठकीत भुसावळ येथील अमृत योजनेचा देखील आढावा घेण्यात आला. भुसावळकर पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, रस्ते खोदलेले आहेत यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या योजनेचा आढावा घेताना काही त्रुट्या मिळाल्या आहेत. त्यावरून सादर कंत्राटदाराला जिल्हाधिकारी यांच्याकडून नोटीस बजावण्यात येत आहे अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!