अमळनेर बस दुर्घटना; मृतांमध्ये वाहक-चालंका सह अमळनेरच्या चौघांचा समावेश
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आज सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील आठ जणांची ओळख पटली असून मृतांमध्ये बसचे अमळनेर च्या चालक व वाहकाचाही समावेश आहेत. या दोघांसह चौघे जण अंमळनेरमधील एक महिला मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. अपघातामध्ये बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच निंबाजी आनंदा पाटील आणि कमलाबाई निंबाजी पाटील यांचाही मृत्यू झाला असून चौघ जण अमळनेरमधील आहेत तर मृत्यू झालेल्यांपैकी अरवा मूर्तजा बोरा या अकोल्यातील आहेत. तर दोघे जण राजस्थान आणि एक जण इंदूरमधील आहेत.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतू पुलावर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून बस नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसटी अपघातातील आठ जणांची पटली ओळख १) चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील (वय- ४५, अमळनेर),२) वाहक – प्रकाश चौधरी (वय- ४०, अमळनेर),३) निंबाजी आनंदा पाटील (वय- ६०, अमळनेर),४) कमलाबाई निंबाजी पाटील (वय ५५, अमळनेर),५) चेतन गोपाल जांगिड (जयपुर, राजस्थान),६) जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०, उदयपुर, राजस्थान),७) सैफुद्दीन अब्बास नूरानी (इंदूर),८) अरवा मूर्तजा बोरा (वय २७ मूर्तिजापूर, अकोला) माजी मंत्री गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना ! जळगाव जिल्ह्यात बचावकार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात असून धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तेथील परिस्थिती मला दाखवली आहे. सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. मात्र कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जे बेपत्ता झाले त्यांना शोधण्याचे काम सुरु असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच भाजपाचे नेते माजी मंत्री गिरिश महाजन यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माझे बचावकार्यावर लक्ष असल्याचेही फडणवीसांनी सांगितले