भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासनराजकीय

जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधी मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २४ गावांमध्ये, भडगाव तालुक्यातील ६ गावांमध्ये, भुसावळ तालुक्यातील ६ गावांमध्ये, बोदवड तालुक्यातील ५ गावांमध्ये , चाळीसगाव तालुक्यातील १६ गावांमध्ये , चोपडा तालुक्यातील ५ गावांमध्ये, धरणगाव तालुक्यातील ७ गावांमध्ये , एरंडोल तालुक्यातील ६ गावांमध्ये , जळगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये, जामनेर तालुक्यातील १२ गावांमध्ये , मुक्ताईनगर तालुक्यातील २ गावांमध्ये , पारोळा तालुक्यातील ९ गावांमध्ये , रावेर तालुक्यातील २२ गावांमध्ये , यावल तालुक्यातील ८ गावांमध्ये हि निवडणूक होणार असून नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!