भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिकसामाजिक

कुऱ्हा काकोडा येथे विविध उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | स्थानिक परम पूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था द्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा काकोडा येथे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, तसेच बीज अंकुरे अंकुरे बीज संकलन अभियान यांचा समावेश होता.

वृक्षारोपणः महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डन परिसरात विविध स्वदेशी प्रजातींची रोपे लावून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोदजी शिवलकर सर, सचिव श्री भालचंद्र कुलकर्णी सर, कोषाध्यक्ष श्री प्रल्हादजी बढे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी महाविद्यालयाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती प्राचार्य डॉ. पी व्ही पिंगळे यांनी दिली. पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे रक्षण कसे करायचे याकरिता भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी व्ही पिंगळे यांनी या उपक्रमांना विशेष महत्त्व दिले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याची काळजी कशी घ्यावी हे शिकायला मिळेल.”

बीज अंकुरे अंकुरे – बीज संकलन अभियानांतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि विद्यार्थी विकास विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने संकलित विविध बिया आज महाविद्यालयाला सुपूर्त करण्यात आल्या व त्यातील काही बियांचे रोपण करण्यात आले तर काहींचे सीडबॉल बनवण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल सोनवणे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. कविता पर्वते, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ. जितेश कुलकर्णी, प्रा. मनोज न्हावी, प्रा. अर्जुन गोरले, प्रा. विनोद भालेराव, प्रा. भाग्यश्री ढगे, प्रा. वृषाली शिमरे, प्रा. योगिता पाटील, श्री सुरेश पवार आदी उपस्थित होते.

हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!