अमळनेरक्राईमजळगाव

लाचखोर उपविभागीय अभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !

जळगाव, प्रतिनिधी : अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला तब्बल २ लाख ५८ हजाराची लाच घेताना आज लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केल्याने जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, धुळे येथील तक्रारदार यांनी नंदुरबार येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याकडून आदिवासी मुलींच्या वसतिगृहातच्या कामाचा ठेका घेतला. या ठिकानी झालेल्या बांधकामाचे बिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आदा करण्याच्या मोबदल्यात दिनेश पाटील आणि सत्यजित गांधीलकर यांनी तक्रारदाराकडून २ लाख ५८ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. या विरुद्ध तक्रार केली असता, धुळे लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षकसुनिल कुराडे व पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक श्री.मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे,कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे,संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेशमोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहात अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!