Jalgaon Murder ; जळगाव मध्ये डोके दगडाने ठेचून तरुणांचा खून
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगावला खून म्हणजे काही नवीन नाही, येथे खुनाचे सत्र अधूनमधून सुरूच असते, तसेच रात्री जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळच्या मालधक्क्याजवळच्या गोदामा समोर काल रात्री उशिरा एका तरूणाचे डोके दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली.
- राज्यात अति मुसळधार पाऊस,या जिह्यात गारपिटीचा इशारा
- प्रतिक्षा संपली, 13 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल
- भुसावळ मध्ये प्रौढाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
खून झाल्या बाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तपास करून संबंधीत तरूणाची ओळख पटवून मयत तरूण हा अनिकेत गणेश गायकवाड,रा. राजमालती नगर, जळगाव , असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी या तरूणाच्या कुटुंबियांना पहाटे अडीच वाजता याबाबतची माहिती दिली.अनिकेत हा मिस्तरीचे काम करीत होता. या मृतदेहाच्या डोक्याचा भाग पुर्णपणे चेंदामेंदा केला गेलेला असून त्याचे बाजुला रक्ताने भरलेला मोठा दगड पडलेला होता.
सदर प्रेताचा चेहरा ओळखु येत नसल्याने प्रेतांचे अंगावरील कपड्यावरुन व त्याचे हातातील कड्यावरुन व पायातील काळ्या रंगाचा दोर्यावरुन सदर प्रेत हे ओळखले गेले,या बाबत अनिकेत चे वडील गणेश रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात मारेकर्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत शहर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.