जळगाव एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याना अखेर अटक
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। गेल्या सुमारे दीड वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी फरार होते. आज १५ जानेवारी सोमवार रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या दीड वर्षा पूर्वी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले होते. व त्याना नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयासह उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी निराशा पडली होती.
यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी आज सोमवार १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले आहे.या प्रकरणाचा तपास करीत असलेले सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.