कौटुंबिक वादातून गळफास घेऊन एकाची आत्महत्या
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील धनगरवाड्यात कौटुंबिक वादातून आज दुपारी गणेश आत्माराम बडगुजर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली .
शहरातील गणेश आत्माराम बडगुजर,वय- ४८ , रा. धनगर वाडा, हरिविठ्ठल नगर याच्या घरात मुलीचे लग्न झाल्या पासून घरात भांडण सुरु होते. पत्नी प्रतिभा बडगुजर भांडणाला कंटाळून मोठ्या मुलीकडे राहत होत्या. आज त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या, गणेश यांच्यासह बहीण व आई घरी होते. यावेळी पुन्हा या सर्वांचे भांडण झाले. गल्लीतील लोकांनी दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी व मोठी मुलगी घरातून निघून गेली. यापाठोपाठ मृताची आई व बहिणही घरातून बाहेर गेले ,बहिणीला सोडून आई घरी आल्यावर आईने दार उघडले असता घरात गणेशने दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच आईने आक्रोश करत हंबरडा फोडला.