जळगावशैक्षणिक

बारावीचा जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के,मुली अव्वल

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज बुधवारी एचएससी बारावीचा निकाला ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला असून जळगाव जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे या परीक्षेत नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे.

बारावी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जाहीर झालेल्या निकालानुसार, जळगाव जिल्ह्याचा ९५.५२ टक्के निकाल लागला असून शास्त्र शाखेचा निकाल ९९.०७, वाणिज्य ९६.९३, कला ९२.२९ तर एमसीव्हीसी ९३.८० टक्के निकाल लागला असून निकालात मुलींनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बाजी मारली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!