सावदा हायस्कूलचा बारावी विज्ञान चा निकाल 100 टक्के
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मार्च 2022 मध्ये झालेल्या बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज बुधवार रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला यात सावदा नगरपालिका संचलित आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा,च्या 12 वी विज्ञान शाखे मध्ये 116 पैकी 116 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला,12 वी विज्ञान मध्ये बेंडाळे गार्गी रेवानंद ही 528 गुण (88%) मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, सोनवणे हर्षदा संजय हिने 515 गुण (85.33%)मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
- बोगस शिक्षक भरती घोटाळा ; तराळ विद्यालयाचा कागदावर शिपाई, मात्र प्रत्यक्षात अघोषित मालक असलेल्या अमोल कुळकर्णीला चारचाकी सह इंदुरहून अटक
- जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान; पाहा संपूर्ण कार्यक्रम
- शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! जळगावातील १३२ बोगस मान्यता रद्द; दोषी शिक्षक, संस्थाचालक व तत्कालीन मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
- यावल पालिकेत काँग्रेसला धक्का! तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक शेख निसार अपात्र
- यावल मध्ये विसर्जन मिरवणुकीत नगरसेवकाला मारहाण, तर नगरसेविकेला शिवीगाळ
तसेच 12 वी कला शाखेत 122 पैकी 116 विद्यार्थी पास झाले असून कला शाखेचा 95.08 टक्के निकाल लागला असून यात चौधरी जयश्री सोपान हिने 496 गुण (82.67) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर भोई पूजा प्रकाश हिने 470 गुण (78.33)मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. एकूण 238 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या पैकी 232 विद्यार्थी पास झाले, असा एकूण 97.47 टक्के निकाल लागला असून त्याचे प्रशासन अधिकारी कैलास कडलक, मुख्याधिकारी किशोर चव्हाण,मुख्याध्यापक सी सी सपकाळे,पर्यवेक्षक जे व्ही तायडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनदन केले.






