जळगाव खुनानं हादरलं, केस मागे न घेतल्याच्या वाद
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जुनी दाखल केलेली केस मागे न घेतल्याच्या वादातून जळगावात तरुणाची धारदार चॉपरने हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना रविवार दिनाक २२ मार्च रोजी जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात दुपारी तीन वाजता घडली. नितीन नाना काळे. ३५ वर्ष, रा. जैनाबाद, जळगाव. या तरुणाचा धारदार चॉपर ने खून करण्यात आला.या प्रकरणी शाम तुकाराम सूर्यवंशी. दिनकर नगर, जळगाव. याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैनाबाद परिसरात नितीन हा तरुण आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ-बहीण यांच्यासह शहरात राहत होता. काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करीत होता. गेल्या चार दिवसां पासून सुट्टीच्या कारणाने व कोर्टाच्या कामानिमित्ताने जळगावी आला मात्र रविवारी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने वर्षभरापूर्वी केलेली केस मागे घ्यावी म्हणून वाद घातला व या वादात धारदार चॉपर ने नितीनवर वार केल्याने त्याचे पोटाचे आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी नितीन काळे याला महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवार, २३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किरकोळ कारणावरून झालेल्या खुनामुळे जळगाव मात्र हादरले.

