भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात संतापाचे वातावरण : स्व. सुनील दैवे प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | बोदवड येथील रहिवासी स्वर्गीय सुनील शामराव दैवे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे मुक्ताईनगरसह परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मुक्ताईनगर व परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात संबंधित आरोपींना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांना आवश्यक संरक्षण व मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!