धक्कादायक : कारागृहात नेत असतांना पोलीसांना गुंगारा देत, कैदी फरार !
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : भुसावळ येथून जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची खळबळजनक घटना दुपारी घडली असून याप्रकरणी कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील लोणी बुद्रुक ता. रिसोड येथील कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत आहे. याची पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुरुवार, दि. १९ मे रोजी भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणण्यात आले होते.
प्रभारी जेल अधीक्षक यांना कागदपत्र दाखवत कैदी हा वेडसर असल्याचे सांगत असतांनाच कैदी महेश दीक्षे हा पोलीस नाईक अमित तडवी यांच्या हाताला झटका देऊन सबजेल पोलीस लाईनच्या गल्लीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. भुसावळ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. अखेर भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पोलीस नाईक अमित तडवी यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कैदी महेश शिवदास दीक्षे याच्याविरोधात नोंद करण्यात आला आहे.