शरीफभाई पिंजारी यांची जामनेर न.पा.स्वीकृत नगरसेवक पदी निवड
जामनेर,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। येथील सामाजिक कार्यकर्ते शरीफ भाई पिंजारी यांची जामनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जामनेर येथील नगरपरिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत शेख शरीफ शेख अहमद पिंजारी यांची स्वीकृत नगरसेवक पदावर निवड करण्यात आली असून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन ,लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.साधना महाजन यांच्या आशीर्वादाने व सन्मानीय नगरसेवक, नगरसेविका यांचे सहकार्यने ही निवड करण्यात आली. शरीफ भाई पिंजारी यांची जामनेर नगरपरिषद नगरसेवक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.