भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

जामनेर तालुका हादरला! महिलेवर सामूहिक अत्याचार

जामनेर, मंडे टु मंडे न्युज | जामनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली असून जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा दिवसांत दोन आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचाराच्या घटना घडल्याने आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अत्याचार करणाऱ्या चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून यात अजून तीन ते चार संशयीत आरोपी असल्याची माहिती मिळत आहे

या प्रकरणात जामनेर तालुक्यातील गोद्री येथील तडवी भिल्ल समाजाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गोद्रीतांडा येथील आरोपी रामेश्वर गणपत राठोड याने पोह्यांमध्ये गुंगीचे औषध टाकून मला त्याच्या घरात नेऊन त्याच्यासह सूरज भिमसिंग राठोड, पवन छगन राठोड व धारमल कृपाल साबळे अशा चौघांनी माझ्यावर अत्याचार केला व घटनेचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा शेतातून घराकडे येत असतांना रामेश्वर गणपत राठोड याने बळजबरी त्याच्या दुचाकीवर बसवून मित्राच्या मदतीने सोमसिंग मास्तर यांच्या शेताच्या पाटनाल्यावर घेऊन गेले तेथे दोरीने बांधून, बंदुकीचा धाक दाखवून चौघांनी सामुहिक अत्याचार केला व इतर तीन ते चार संशयितांनी चित्रीकरण करून प्रसारित करण्याची धमकी दिली.

दि. १५ जुलै रोजी पीडित महिला पतीसह पोलीस ठाण्यात तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी आली असता पोलिसांनी टाळाटाळ केल्याने तिच्या पतीने हातात पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे देखील महिलेने सांगितले. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!