शिंगाडी येथील जीवन चौधरी यांचा निंभोरा पोलीस ठाण्यात झाला गौरव…
गोलवाडे, ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज, जीवन महाजन | रावेर तालुक्यातील शिंगाडी या छोट्याशा चिमुकल्या गावातील जीवन रामकृष्ण चौधरी याने जागतिक पातळीवर डब्ल्यू डब्ल्यू सीडी स्विफ्ट विद्यार्थी स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये विशेष विजेता म्हणून स्थान पटकावले असून जगातील 50 निवडक विद्यार्थ्यांमध्ये चमकला आहे.
एप्पल कंपनी तर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत निवड होणे. हे भारतासाठी गौरवशाली बाब ठरली आहे. जीवनाची ही कामगिरी देशातील उदयो मुख्य डिजिटल प्रतिभेचे प्रतीक मानले जात आहे. जीवनाला कॉलिफिया अमेरिका येथे होणाऱ्या एप्पल जागतिक विकसक परिषदेमध्ये सहभागी होण्याचे प्रत्यक्ष आमंत्रण मिळाले. असून त्याचा संपूर्ण प्रवास खर्च व वास्तव्याचा खर्च एप्पल कंपनीतर्फे प्रयोजित केला आहे. तो दिनांक 7 जून रोजी अमेरिकेला प्रयाण करणार आहे.
जीवनाच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी निंभोरा पोलीस स्टेशन येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाण्याचे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे. पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे . यांनी जीवन चौधरी याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व सन्मानित केले . यावेळी बोलताना अधिकारी बोचरे साहेब म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त योग्य दिशा व संधी मिळाल्यास ते जागतिक स्तरावर झडकू शकतात. जीवन चौधरी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे यावेळी सूत्रसंचालन गोपनीय शाखेचे अमोल वाघ. यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार साहेब यांनी केले..