भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; पीक विमा योजनेबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजने बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात यावर्षीपासून जूनी पीक विमा योजना होणार लागू होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. या पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना २ टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.

शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत मिळत नसल्याची ओरड केली जात होती. पीक विमा योजनेवरुन सातत्यानं आरोप प्रत्यारोप देखील होत होते. अशातच कृषीमंत्री कोकाटे यांनी जुनी पिक विमा योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्ता शेतकऱ्यांना २ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. यामुळं गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केलीची माहिती कोकाटे यांनी दिली आहे.

तसेच पीक विम्याबाबत बैठक घेवून प्रश्न सोडवणार असल्याचेही ते म्हणाले. यंदा मे मध्येच पाऊस होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धोरण ठरवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार आहोत. यावर्षी कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे. तो ते धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. महत्त्वाचं म्हणजे पिक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पहावी अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!