खिर्डी बु! ग्रा.पं ने लाखो रु.खर्च करून लावलेल्या कॅमेरेची दुर्दशा!
खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील खिर्डी बु! गावातील ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले कॅमेरे ची ऐशीतैशी. कॅमेऱ्याचा पलटली दिशा.
सविस्तर वृत्त असे की _रावेर तालुक्यातील खिर्डी बु! ग्रामपंचायत प्रशासन अंतर्गत गावात महत्वाचे अनेक ठिकाणी सुरूक्षा च्य दृष्टीने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून कॅमेरे बसविण्यात आले. परतू ते कॅमेरे व्यवस्थित रित्या फिटिंग न करता धातूर मातुर काम करून लाऊन दिल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच लावण्यात आलेले कॅमेरे हे निकृष्ट दर्जाचे तर नाहीत ना? जर उत्तम क्वॉलिटी चे असते तर अशी अवस्था झाली नसती. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेच्या व शासनाच्या पैशांचा चुराडा न होता चागल्या व नामांकित कंपनीचे उत्तम क्वॉलिटी असलेले कॅमेरे व्यवस्थित रित्या फिटिंग करून लक्ष पूर्वक बसविण्यात येण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे यांनी केली आहे.