खिर्डी खु ग्राम पंचायत प्रशासनाची ग्राम विकास विभागाच्या आदेशाला केराची टोपली
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। ग्राम विकास विभागाने दि ८ एप्रिल २०२२ रोजी पंचायती राज दिनाच्या निमित्ताने बाल सभेचे आयोजन करणे बाबत परिपत्रक काढण्यात आले होते.दरवर्षी आपण २४ एप्रिल हा पंचायती राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून राज्यामध्ये ग्रामसभा आयोजना बरोबरच बालसभा आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
वरील सूचनांचे पालन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये केले जावे असे असूनही खिर्डी खु येथील ग्राम पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून ग्राम सभा आणि बालसभा आयोजित करण्यात आली नाही.याबाबत ग्रामस्थांनी माहिती विचारली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
शासन स्तरावरून भरपूर योजना राबविल्या जातात मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीनते मुळे अनेक गोरगरीब लाभार्थी वंचित का? राहतात हे यावरून दिसून येत आहे.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी,काय कारवाई करतील ? का पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न उपस्थित होत असून याकडे खिर्डी खु.येथील ग्रामस्थांसह सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.