भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

 यावल तालुका हादरला! सोनोग्राफी रिपोर्टच्या वादातून अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं, चिमुकल्याचा मृत्यू, सासू व पतीला अटक

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. सोनोग्राफी रिपोर्टच्या कौटुंबिक कलहातून सासू आणि पतीने आपल्याच अंध पत्नीसह साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या क्रूर कृत्यात साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच बुडून मृत्यू झाला आहे, तर त्याची अंध माता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ही घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे उघडकीस आली

किनगाव शिवारातील एका विहिरीत महिला आणि लहान मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. दुर्दैवाने साडेतीन वर्षाचा मुलगा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर महिला गंभीर जखमी होती. विहिरीत पडलेले दोघेही अंध असल्याने सुरुवातीला हा घातपात नसून केवळ एक अपघात असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात होता.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी माता सरस्वती पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. सरस्वती पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा या दोघांनाही त्यांची सासू आशाबाई पाटील आणि स्वतः अंध असलेला पती स्वप्नील पाटील यांनीच विहिरीत ढकलल्याचे काबुल केले.

काय आहे प्रकरण.
आरोपी पती स्वप्नील पाटील आणि त्याची पत्नी सरस्वती दोघेही अंध आहेत. सरस्वती या पुन्हा गरोदर असताना त्यांच्या वैद्यकीय तपासणीत म्हणजेच सोनोग्राफीमध्ये होणारे बाळ देखील अंध असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतानाही सरस्वती यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय कायम ठेवला आणि त्या गर्भपाताला तयार नव्हत्या. याच कारणावरून पती स्वप्नील आणि सासू आशाबाई यांच्यासोबत सरस्वती यांचा गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. याप्रकरणी यावल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!