भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमुंबई

भारतीयांना ठार मारा, मुलांना बुडवून टाका…’ आणि त्यांच्या बायकाना…… ऑस्ट्रेलियात धक्कादायक व्हिडिओ व्हायरल……

मंडे टु मंडे न्युज | ऑस्ट्रेलियात स्थानिक ट्रकचालकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वायरलेस ऑडिओ चॅनेलवर (UHF रेडिओ) भारतीयांविरोधात अत्यंत संतापजनक आणि वर्णद्वेषी वक्तव्ये करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यम संस्था ‘ABC News’ च्या वृत्तानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये काही चालक “भारतीयांना मारून टाका, गोऱ्या माणसांच्या बाजूने उभे राहा आणि त्यांच्या महिलांना गुलाम बनवा,” अशा हिंसक आणि द्वेषयुक्त धमक्या देताना ऐकू येत आहेत.

या धक्कादायक व्हायरल ऑडिओमधील वक्तव्ये: ऑडिओ क्लिपमध्ये एक ऑस्ट्रेलियन चालक म्हणतो की, “इथे गृहयुद्ध होणार आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना मारून टाकू, त्यांच्या मुलांना पाण्यात बुडवू आणि महिलांना गुलाम बनवू.

ऑस्ट्रेलियात मालवाहू ट्रकचालक वाहतूक कोंडी, अपघात किंवा पोलिसांच्या तपासणीची माहिती एकमेकांना देण्यासाठी ‘अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी’ (UHF) रेडिओ चॅनेल्स वापरतात. मात्र, आता या चॅनेल्सचा वापर भारतीय वंशाच्या चालकांना टार्गेट करण्यासाठी आणि वर्णद्वेषी शिवीगाळ करण्यासाठी केला जात आहे. अनेक भारतीय वंशाच्या चालकांनी सांगितले की, रस्त्यांवर किंवा इंधन भरण्याच्या ठिकाणी पंजाबी किंवा भारतीय उच्चारात बोलल्यास त्यांना थेट अपमानाला सामोरे जावे लागते. सततच्या छळामुळे काही चालकांनी या रेडिओवर बोलणेच बंद केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे रेस डिस्क्रिमिनेशन कमिशनर (वर्णद्वेष विरोधी आयुक्त) गिरीधरन सिवारामन यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात सध्या स्थलांतरविरोधी भावना वाढल्या आहेत. भारतीय समुदाय हा तेथील मोठा स्थलांतरित समुदाय असल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे.
स्थानिक चालकांकडून असा आरोप केला जातो की भारतीय चालक जास्त अपघात करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियात अपघातांची आकडेवारी वंश किंवा जातीनुसार गोळा केली जात नाही, त्यामुळे हा आरोप निव्वळ गैरसमजातून केला जात आहे.या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषी ऑस्ट्रेलियन ट्रकचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

भारतीयांना ठार मारा, मुलांना बुडवून टाका…’
या ऑडिओमध्ये काही ट्रकचालक भारतीयांविरोधात संतापजनक वक्तव्य करताना ऐकू येतात. ऑडिओमध्ये एक आवाज म्हणतो, भारतीयांना ठार मारा… गोऱ्या माणसाच्या बाजूने उभे राहा. गृहयुद्ध होणार आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना मारून टाकू, त्यांच्या मुलांना पाण्यात बुडवू आणि महिलांना गुलाम बनवू. या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!