भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अन्न औषध प्रशासना ची (FDA) टीम सावद्यात, फैजपूर रस्त्यावरील डेअरीला भेट?

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | सध्या राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीम अंतर्गत रावेर तालुक्यातील सावदा शहर व परिसरात अन्न औषध प्रशासन (FDA) ची टीम ने हजेरी देत तपासणी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा शहरातील सावदा फैजपूर रोडवरील साईबाबा मंदिराजवळील बापू डेअरीला भेट दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भेटीत काय चौकशी झाली याची माहिती समोर आलेली नाही. त्या नंतर टीम दिव्याची गाडी घेऊन सावदा स्टेशन कडे गेली होती. येथून पुन्हा सावद्याकडे परत येऊन गाडी टीम सह फैजपूर कडे रवाना झाली. मात्र बापू डेअरी किंवा इतर ठिकाणी काय कारवाईं हे अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!