भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

महिला लैंगिक शोषण अत्याचार प्रकरणी LCB चे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची उचलबांगडी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महिलेवर अत्याचाराच्या आरोपानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले असून, त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांच्याकडे एलसीबीचा चार्ज सोपविण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचेवर महिलेचे लैंगिक शोषण, गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार मंगेश पाटील यांनी केला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी आदेश काढून गुन्हे शाखेचे संदीप पाटील यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेत कार्यरत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे एलसीबीचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला होता. संदीप पाटील यांनी एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप असून त्यांनी मलाही गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत कॉल रेकॉर्डिंग बैठकीत ऐकवून दाखविली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आमदार चव्हाण हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!