भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कुंटणखाण्यावर छापा,बांग्लादेशी तरुणीची सुटका, चालक महिलेला अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील गणेश कॉलनी भागात प्रोफेसर कॉलनी येथे कुंटणखाण्यावर एलसीबीसह जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. यात एका बांग्लादेशी तरुणीची सुटका करून कुंटणखाना चालवणाऱ्या पूजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी, जळगाव) या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने जिल्हापेठ पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने
प्रोफेसर कॉलनी येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर
छापा टाकला

सदर संशयित महिलेच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे एक २५ वर्षीय बांगलादेशी तरुणी आढळून आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता बांगलादेशी तरुणीने सांगितले की, नाशिक रेल्वे स्टेशन येथे दिनांक २३ जुलै रोजी हजर असताना संशयित पूजा जाधव या महिलेने, तुला जळगाव येथे चल….. नोकरी लावून देते असे सांगून जळगाव शहरात आणले. तेथे मात्र बळजबरीने देह व्यापार करण्यास सांगितला, असा जबाब बांगलादेशी तरुणीने पोलिसांना दिला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, नितीन बाविस्कर यांच्यासोबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल भारती देशमुख आदींच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!