ऐनपूर महाविद्यालयात “ग्रंथालय ओळख” कार्यक्रम संपन्न
ऐनपूर, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना/वाचकांना ग्रंथालयाची माहिती व्हावी यासाठी ग्रंथालय ओळख (Library Orientation Programme) हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
यात ग्रंथालयात उपलब्ध ज्ञान साधन संपदेची ओळख करून देवून ती आपणापर्यंत कश्या पद्धतीने प्राप्त करून घेता येईल त्याच प्रमाणे ग्रंथालयाचे सर्वसाधारण नियम याविषयी सखोल माहिती दिली गेली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून त्यांना हवी असलेली पुस्तके कश्या प्रकारे मिळवता येतील याबद्दल प्रात्याशिकाद्वारे दाखविण्यात आले. ग्रंथालयात कोणकोणते विभाग आहेत व त्या विभागातून कोणते वाचन साहित्य आपणास महत्वपूर्ण ठरेल याबाबत, तसेच ग्रंथालयातील विविध सेवा सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
याप्रसंगी ग्रंथपाल प्रा. डॉ. संदीप एस. साळुंके यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे तसेच वाचनाचे महत्व पटवुन दिले तेसेच विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आव्हान केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील क्रमिक पुस्तके, संदर्भ पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके, इन्टरनेट सेवा, झेरॉक्स सेवा, ग्रंथालय वेबसाईट, रोजगार विषयक मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती हि प्रत्यक्ष ग्रंथालयात नेवून त्यांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय सल्लागार समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने सर, सचिव प्रा. डॉ. एस. एस. साळुंके, सदस्य प्रा. पी. आर. महाजन, प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा.डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, विद्यार्थी प्रतिनिधी कु. वेदिका महाजन, श्री. हरी पाटील तसेच श्री. महेंद्र महाजन यांचे सहकार्य लाभले.
