लेवा सखी कला मंच डोंबिवली व परिसर आयोजित गुणगौरव सोहळा आणि मंगळागौर कार्यक्रम संपन्न
कल्याण/डोंबिवली. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि.०३ ऑगस्ट २०२५ रोजी लेवा भवन, डोंबिवली येथे लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर तर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी डॉ. श्यामसुंदर पाटील(IAS), आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विवेक महाजन, सौ.जयश्री अमोल जावळे,सौ.वर्षा इंगळे,सौ. मेघमाला पाटील,सौ.भाग्यश्री पाचपांडे श्री.विजय वराडे,श्री.मयुरेश कोल्हे,श्री.नितीन जावळे,श्री डिगंबर पाटील,श्री. सतीश कोल्हे,हर्षल जावळे,श्री. हेमंत चौधरी,श्री. विकास नेहेते,तसेच लेवा मंडळ मुंबई परिसर चे सर्व अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी दहावी आणि बारावी मधील भरघोस गुण मिळविणाऱ्या गुणवंत विदयार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, समाजातील दोन तरुण पायलट यांचा सत्कार केला आणि सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, आ.राजुमामा भोळे यांनी कार्यक्रमास दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या तसेच कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधला या कार्यक्रमास मंडळ च्या संस्थापक अध्यक्ष सौ.निशाताई अत्तरदे यांनी सर्वाचे आभार मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी लेवा सखी कलामंच डोंबिवली आणि परिसर चे सदस्य शुभांगी,श्रध्दा,गुंजन, हेमांगी,सायली,मिनाक्षी, वैशाली,सुरेखा,सोनल,
तृप्ती,धारणा, दिपाली, तसेच इतर सर्व सखी यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
