भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भंडारा अग्नितांडव; नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

जन्मल्यानंतर नवजात बालकाला काही त्रास उद्भ्वल्यास, वजन कमी असल्यास, बाळाची प्रकृती ठीक नसल्यास त्याला अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते. सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  ही घटना  अत्यंत दुर्दैवी होती. नवजात बालकांचे पोस्ट मॉर्टेम करणार नाही. कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!