Big Breaking : वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिंदे गटाने शिवसेनेला (shiv sena) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
- मोठी ब्रेकिंग : रावेर मधून अमोल जावळे पाच हजाराने पुढे
- ब्रेकिंग : ३० हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात, फैजपूर मध्ये गुन्हा दाखल
एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी बाध्य करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंनी अनेक आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक यांची हकालपट्टी केली होती. त्याचप्रमाणे आता शिंदे गटाने युवासेनेकडून हकालपट्टी करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गटाकडून युवासेनेमध्ये किरण साळी यांना महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची?, यावरून नवीन अंकाला सुरूवात झाली आहे.
शिवसेनेला धक्के बसत असतानाच शिंदे गटाला सुद्धा एक मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या तीन माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपात सामील झाले आहेत. माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते या तिघांनी शिवसेना सोडून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश नसून घरवापसी असल्याचं भाजप आमदार गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील नवी मुंबईचे काही नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले होते. मात्र, काही माजी नगरसेवक हे भाजपात गेल्याने नवी मुंबईत शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.