तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा| फजित तो खोटा शीघ्र होय; शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा अभंगातून टोला
कोल्हापूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा आव आणणाऱ्यांची लगेचच फजिती होते, अशा अर्थाचं तुकोबांचा एक अभंग ट्विट करत संभाजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
- मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, १६० टेबलवर मतमोजणी, दुपारी १ वाजे पर्यंत होणार निकालाचे चित्र स्पस्ट
- धक्कादायक : यावल तालुक्यातील सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
- …तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ; पुन्हा राज्यात २०१९ ची परिस्थिती
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणत स्वाभिमान राखण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll’ तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll अशा ट्विट करत संभाजी राजेंनी केलं आहे.
दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजप तसेच शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी न देता शिवसेनेने संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपने धनंजय महाडिक हे उमेदवार राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रिंगणात उभे केले. यांच्यातही चुरशीची लढत पाहयला मिळाली. दरम्यान संजय पवारांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रयत्न करत होते. मात्र फडणवीसांच्या खेळीसमोर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचा डाव फसला. आणि अखेर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. मात्र हे दोन्ही उमेदवार कोल्हापूरचेच असल्याने कुणीतरी एक कोल्हापुरचा खासदार होणार, याचा आनंद संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.