क्राईममहाराष्ट्र

८० हजारांची लाच आणि PSI रंगेहाथ लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात…!

Monday To Monday NewwNetwork

बीड, प्रतिनिधी: अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी 80 हजारांची लाच घेतांना, बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यातील PSI ला रंगेहात पकडण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत असलेले पीएसआय राहुल पांडुरंग लोखंडे यांनी एका तक्रादाराकडून, गुन्ह्यात मंजूर असलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी, तसेच गुन्ह्यातील वाहने जप्त न करण्यासाठी, एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती 80 हजारांची लाच घेताना, बीड व औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या कारवाईने लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!