पेठ परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली; नशिराबादचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | शहराला पाणीपुरवठा करणारी गोठणा जवळील पेठ परिसरातील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने नशिराबादमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने होणार आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिली.
सदर घटनेमुळे शहराच्या जलपुरवठा पुरवठा करण्यास तात्पुरती अडचण निर्माण झाली आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली असून ती युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षांकडून करण्यात आले आहे. तसेच, या कालावधीत नागरिकांनी संयम राखून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
