भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

गोवंश सदृश्य मांस विक्री प्रकरणी महिला पोलिसांच्या ताब्यात

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील फातिमा नगर परिसरात गोवंश सदृश्य मांसाची विक्री करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, फातिमा नगर येथील जिया किराणा दुकानाच्या मागील भागात एक महिला गोवंश सदृश्य मांस विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पथकाने घटनास्थळी अचानक छापा टाकून संबंधित महिलेला रंगेहाथ पकडले. तिच्या ताब्यातून सुमारे ३,००० रुपयांचे गोवंश सदृश्य मांस तसेच एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव परवीन बी मुक्तार कुरेशी (वय ३७, रा. फातिमा नगर, जळगाव) असे असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम २७५, ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाचे कलम ५, ५सी व ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस कर्मचारी शरद भालेराव, सागर बिडे, मोनाली दहिभाते, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे आणि रियाजोद्दीन काझी यांचा समावेश होता, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, जळगाव जिल्हा पोलीस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!