भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

सावदा पोलिसांची मोठी कारवाई ; गहाळ झालेले १ लाख ४९ हजारांचे मोबाईल हस्तगत

सावदा.ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले विविध कंपन्यांचे मोबाईल शोधून काढण्यात सावदा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईल्सच्या मूळ मालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सावदा पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी गहाळ नोंदवहीतील मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर CEIR पोर्टलवर संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक तपासून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासाच्या आधारे भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विलास कोळी (वाघोदा खु.) यांचा २० हजारांचा Vivo, कमलाकर पाटील (रोझोदा) यांचा २० हजारांचा Realme, विनोद जगन्नाथ वाघ (वाघोदा बु.) यांचा १२ हजारांचा Redmi, शेख फरहान शेख इरफान (फैजपूर) यांचा १२ हजारांचा Vivo आणि प्रशांत जावळे (कळमोदा) यांचा १० हजारांचा Motorola मोबाईलचा समावेश आहे.


याशिवाय मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या प्रॉपर्टी मिसिंगमधील १५ हजार रुपये किमतीचा Vivo मोबाईल तसेच दोन iPhone मोबाईल, अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे, असे एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.या मोबाईल्सचे मूळ मालक शोधण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोहेकॉ मोहसीन पठाण, पोहेकॉ विनोद तडवी, पोहेकॉ झाकीर मन्सूरी आणि पोकॉ मनोज तडवी यांनी मोबाईल शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!