क्राईमरावेर

खिर्डी येथे भरदिवसा दरोडा..दीड लाखांचा ऐवज लंपास..रावेर तालुक्यातील प्रकार

रावेर.मंडे टु मंडे न्युज |रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील रहिवासी प्रदीप अशोक महाजन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान घडली.

प्रदीप महाजन हे कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. त्यांचा मुलगा शाळेत गेला होता, तर आई शेतात गेली होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील रोख रक्कम व दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजात ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलाचे कानातील बाळे अंदाजे २१ हजार रुपये, २० ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे व चैन अंदाजे २ हजार ४०० रुपये तसेच १ लाख २७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याचे मुलगा कुणाल याने फोनवरून सांगितल्यानंतर प्रदीप महाजन यांच्या आईने घरी येऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी प्रदीप अशोक महाजन यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदर घटनास्थळी दि.20 रोजी सकाळी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि. मीरा देशमुख, सउपोनि तडवी यांसह एलसीबी चे पथक, फॉरेन्सिक लॅब कर्मचारी फैजपूर विभाग , अंगुली मुद्रा चे सचिन चौधरी जळगाव, यांनी भेट देत घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास सपोनि.मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सउपोनि.तडवी व पॉहेका रिजवान पिंजारी, शिंदे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!