भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ड्रग तस्करांवर मोठी कारवाई; ३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

जळगाव,मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्यरात्री धडक कारवाई करत एमडी (मॅफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार भैय्या सोनवणे हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारे २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या ५६.२९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक चौकशीत जप्त केलेले एमडी ड्रग्ज भैय्या सोनवणे याने विक्रीसाठी पुरवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कांचननगर येथील त्याच्या घराची झाडाझडती घेतली. मात्र तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!